Breaking News
Loading...
Sunday, November 10, 2013

Info Post
शिवशाहीच्या राज्यात तरी नळदुर्गकरांना न्याय मिळेल का?
 नळदुर्गला तालुक्याचा दर्जा देण्याची एकमुखी मागणी
वेध वृत्‍ताचा
- शिवाजी नाईक
                                                                            दि. १५ डिसेंबर १९९६
नळदुर्ग, दि. १४ : मराठवाड्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या उसमानाबाद जिल्ह्यातील बालाघाट डोंगरदर्‍यावर वसलेल्या इतिहासप्रसिद्ध नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी गेल्या ३५ वर्षापासूनची आहे. पर्यटन आणि सांस्कृतिकदृष्टा मोलाचे महत्त्व असलेल्या नळदुर्गला या स्थानाचा निजाम राजवटीत अनन्यसाधारण महत्त्व होते. इंग्रजांच्या काळातही नळदुर्ग महत्त्वाचा मानला जात होता. खंबीर नेतृत्वाअभावी आणि गटबाजीच्या राजकारणामुळे नळदुर्गचा म्हणावा तसा विकास झाला नाही.
      आज नळदुर्गची लोकसंख्या ३० हजारच्या जवळपास असून या शहरांशी ८७ खेडेगावांचा नेहमी संपर्क येतो. स्वातंत्र्योत्तर काळापासून उस्माबाद लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाचाच उमेदवार विजयी झालेला आहे. पण नुकत्याच झालेल्या निवडणुकीत यावेळी मतदारांनी कॉंग्रेसऐवजी युतीच्या उमेदवारास करून नळदूर्ग तालुका करावा, ही मागणी निवडून दिले आहेत. नळदुर्ग व परिसरातील नागरिकांनी बाळगलेल्या अपेक्षा युतीचे शासन तरी पूर्ण करील याच आशेवर त्यांनी मतदान केलेले आहे. विभागीय कार्यालय नळदुर्ग एक ऐतिहासिक शहर असून एकेकाळी या ठिकाणी विभागीय कार्यालय होते. इ.स.१९०४ पर्यंत हे जिल्हयाचे केंद्र होते. अद्यापदेखील उस्मानाबाद जिल्हयातील कोर्टात काम करणार्‍या शिपायांच्या चाव्यावर ‘जिल्हे नळदुर्ग’ असे ऊर्दूत लिहिलेले आढळते. १९०९ सालापर्यंत या ठिकाणी तालुक्याचे केंद्र होते. उस्मानाबाद जिल्हयातील काही विभागाचे काम येथे चालत असे.
    ऐतिहासिक स्थानाचे महत्त्व कमी होऊ नये म्हणून त्यासाठी त्यावेळच्या निजामाने खास फर्मान काढून तुळजापूर तालुक्याचे मुन्सुफ कोर्ट या ठिकाणी ठेवले. १९०९ ते १९५१ पर्यंत नळदुर्ग येथेच मुन्सफ कोर्ट होते. पण स्वातंत्र्य मिळालानंतर अस्तित्वात आलेल्या हैद्राबाद राज्याने जिथे तालुका तिथे कोर्ट हे कारण दाखवून हे कोर्ट तुळजापूरला हलवले. पण हा न्याय नळदुर्गच्या बाबतीतच लावण्यात आला आहे. कारण अद्यापही मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील मुन्सफ कोर्ट ‘सेल’ या ठिकाणी आहे. शासनाने नळदुर्गच्या या ऐतिहासिक परंपरेकडे दूर्लक्ष करून अन्याय केलेला असला तरी परिसरातील आणि नळदुर्गच्या जनतेने या गावाचे महत्त्व आपल्या प्रयत्नाने आणि चिकाटीने अद्यापही टिकवून ठेवलेला आहे.  
       नळदुर्ग तालुका करावी ही माागणी फार जूनी असून पूर्वीचे हैदराबाद राज्य आणि त्यानंतर राज्य पुनर्रचना होवून अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र शासनासमोर या तालुका मागणीचा वेळोवळी पाठवपुरावा नळदुर्गच्या आणि परिसरातलल जनतेने केलेला आहे. त्यावेळी अनेक ग्रामपंचायतीने तशा प्रकारचे ठराव करून नळदुर्ग तालुका करवा, ही मागणी केली आहे.
ऐतिहासिक वारसा
नळदुर्ग येथील किल्ला आणि त्यातील पाणीमहाल अत्यंत प्रेक्षणीय असून, आजूबाजहूचा परिसर निसर्गरम्य सौंदर्याने नटलेला आहे. किल्ल्यातील पाणीमहाल आणि भोवतालचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी या ठिकाणी अनेक राज्यातुन असंख्य येऊन जातात. अद्यापदेखील ‘नर मादी’ तून पाणी वाहणारा विलोभनीश दृश्य पाहण्यासाठी नळदुर्गला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाला आहे. इंग्रज राजवटीत सोलापूरचे गव्हर्नर असलेले सर मेडोज टेलर यांचे हे अत्यंत आवडीचे असे विश्रांती स्थान होते. सर मेडोज टेलरनी नळदुर्ग परिसरातील निसर्ग सौंदर्याचे ‘दक्षिणेतील काश्मीर’ असे उल्लेख आपल्या ‘कनेक्शन ऑफ टग्ज’ या पुस्तकात अत्यंत विस्ताराने केलेला आहे. पोलिस ऍक्शनच्या काळात या ठिकाणाला सैनिकी दर्जास अनन्यसाधारण महत्त्व हाते. याचा उल्लेख एम. मुनसी यांनी आपल्या ‘ऍन एड ऑफ एरा’ या पुस्तकात अत्यंत विस्तारपूर्वक केला आहे.
      काही वर्षापुर्वी महाराष्ट्रातील प्रसिद्ध इतिहासतज्ञ डॉ. ग.ह. खरे, बाबासाहेब पुरंदरे, डॉ.ग.वा. तगारे, कृ.रा. पेंडसे आदींनी या किल्लांसबंधी आणि गावासंबंधी, गौरपर उद्गार काढून पेशव्यांच्या काळात हे एक महत्त्वाचे ठाणे होते, असे सांगुन या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीने त्याही काळात प्रयत्न झाले होते, असे म्हटले आहे.
प्रेक्षणीय स्थळ
सध्याचे खंडाळा धरण हे पेशव्यांनी बांधलेल्या धरणाच्या जागेवरच बांधलेले आहे. यावरुन त्या काळातील विकास कार्याची कल्पना येते. गतकाळी नामवंत साहित्यिक प्रा.द.मा. मिरासदार, राम शेवाळकर, डॉ. आनंद यादव, बापू कुंभोजकर, श्रीपाद जोशी, रा.रं. बोराडे यांनी भेटी देऊन नळदुर्ग किल्ल्याची पाहणी करून या गावास तालुक्याचा दर्जा मिळाला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले हाते. माजी मुख्यमंत्री कौ. के.मा. कन्नमवार यांनी भेट दिली होती. या परिसरातील नागरिकांनी नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यांनी तालुक्याचा दर्जा देण्याबाबत आपण लवकरच निर्णय घेऊ, असा आश्वासन त्यांच्याबरोबर असलेल्या येथील नगरपरिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष प्रभाकर पुदाले यांना दिले होते. पण नंतर कन्नमवार यांचे निधन झाले आणि हा प्रश्‍न तसाच मागे राहिला.
      यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असताना किल्ल्याच्या परिसरात एखादा दारूगोळा किंवा शस्त्रनिर्मितीचा कारखाना काढता येतो का, याचा मागावा घेण्याचा प्रयत्न केला. यावर केंद्र सरकार आणि विशेषत: संरक्षण खाते विचार करत असल्याचे पत्र त्यावेळी नळदुर्ग परिषदेला आलेले आहे.
शासनाकडे अहवाल सादर
सन १९६७-६८ साली महाराष्ट्र शासनाने एक तालुका आणि जिल्हा पुनर्रचरा समिती स्थापन केली होती. या समितीने नळदुर्गला भेट देवून या भागाची पाहणी केली. या परिसरातील जनतेची मागणी लक्षात घेता अणि तालुका निर्मितीास विविध सुविधा लक्षात घेता समितीने या शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा, असा अहवाल सादर केला. त्यानंतर १९७९-८० साली याबाबत महाराष्ट्र शासनाने आणखी एक समिती स्थापन केली. या समितीमध्ये त्यावेळचे औरंगाबादचे तत्कालीन विभागीय आयुक्त यांच्या अध्यतेखाली उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. डांगे, जि.प.चे कार्यकारी अधिकारी जोशी यांची नेमणूक केली होती. या दोन्ही अधिकार्‍यांनी नळदुर्गमधील शासकीय आणि निमशासकीय इमारतीची पाहणी केली होती.
      त्याचप्रमाणे शासनाने पाठवलेल्या सर्व प्रश्‍नावलीप्रमाणे सर्व माहिती जमा केली. याही समितीने नळदुर्ग हे तालुका करण्याच्या दृष्टीने सर्व सोयी सुविधांनी चांगले ठिकाण असल्याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला.
सर्व सुविधा उपलब्ध
नळदुर्ग शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवर वसलेलं मध्यवर्ती ठिकाण आह. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश इत्यादी राज्यातील राजधान्या आणि महत्त्वाच्या शहरांना जोडणारे मार्ग या ठिकाणावरून जातात. परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना गावापर्यंत जाण्या-येण्यासाठी बसेसची व्यवस्था राज्य परिवहन मंडळाने केली आहे. याठिकाणी बस डेपोची योजना मंजूर झाली होती. पण कुचकामी नेतृत्वामुळे ही योजना इतरत्र हलवण्यात आलेली आहे. सध्या येथुन चारशेच्या जवळपास बसेसची दररोज वाहतुक असून, नजीकच्या काळात या ठिकाणी बस डेपोची योजना परिवहन महामंडळाकडे आहे.
       अनेक शासकीय आणि निमशासकीय इमारती आहेत. त्या इमारती अद्यापही सुस्थितीत आहेत. त्या सर्व इमारतीत तालुक्याचा कार्यालयाची व्यवस्था होऊ शकते. अत्यंत कमी खर्चात तालुक्यात कार्याचा प्रारंभ होऊ शकतो. प्राथमिक शिक्षणापासुन, महाविद्यालयीने, पदव्युत्तर तसेच अध्यापक विद्यालय प्रशिक्षण केंद्र अशी शिक्षण घेण्याची येथे व्यवस्था आहे. तसेच हैदराबाद स्टेट बँक, पोलिस ठाणे, सरकारी दवाखाना, पोस्ट ऑफिस, तार ऑफिस, दूरध्वनी एक्स्वेंज आणि १३३ के.व्ही. विद्युत केंद्र, पाटबंधारे कार्यालय, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपकार्यालय, मृदसंधारणचे कार्यालय, असे शासकीय विविध कार्यालय फार पुर्वीपासुन आहेत. सर्व सोयीनीयुक्त असा शासकीय विश्रामगृह तर या गृहाच्या उत्तर बाजूस दृष्टीस पडणारे निसर्ग सौंदर्य पाहून अनेक सरकारी अधिकारी आणि प्रवासी येथे राहण्यास उत्सुक असतात. येथील किल्ल्यात मराठी, हिंदी, तेलगु, कन्नड भाषामध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण यापूर्वी करण्यात आले आहे. मुंबई, कोल्हापूर, बंगलोरचे अनेक चित्रपटांच्या शुटींगसाठी येत असतात.
        याठिकाणी खंडोबा पणन द्राक्षे शीतगृह असून यातील मोठ्याप्रमाणात द्राक्षे इंग्लंड, फ्रान्स, लंडन यासारख्या परदेशात विक्रीकरता जातात. त्यामुळे शेतकर्‍यांना चांगला बाजारभाव मिळतो. तसेच श्री तुळजाभवानी साखर कारखाना, भगीरथ दाणेदार मिश्र खत कारखाना आणि ऊस मळीपासुन मद्याकृ तयार करण्याची डिस्टिलरी असे असून अनेक खाजगी लघु कारखानेदेखील आहेत.
        या शहरातील नगरपालिका स्वयंपूर्ण असून वार्षिक उत्पन्न अंदाजे पन्नास लाखांच्या घरात आहे. या परिसरातील गावांचा महसूल जवळजवळ सहा लाखांच्या आसपास होतो. या जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी हणमंतराव मानवीकर यांनी या शहराचे मोठ्या शहरांशी असलेले सान्निध्य आणि उपलब्ध असलेल्या सोयी लक्षात घेऊन या गावातील काही क्षेत्र फार पूर्वीच औद्योगिक परिसर म्हणुन घोषित केलेला आहे. त्याप्रमाणे सध्या लहान-लहान उद्योग धंदे उद्योजक उभे करत असल्याचे दिसत आहे.
         नळदुर्ग परिसरातील बोरी धरण, हरणा, खंडाळा आणि पळस निलेगांव प्रकल्प बाभळगाव या धरणामुळे परिसरातील जमीन सुजलाम् सुफलाम् झालेली आहे. या ठिकाणी दुग्ध उत्पादन संस्था असल्याने विकासाच्या दृष्टीने उस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्ग हा एक आदर्श तालुका राहील.
       माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी जाहीर सभेत नळदुर्गला तालुका करण्याचे आश्वासन देऊन लवकर नळदुर्गच्या पुर्वेस औद्योगिक वसाहत उभी केली जाईल, असे दोन वर्षापूर्वी तुळजापूर येथील झालेल्या शेतकरी मेळाव्यात दिले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. नगराध्यक्ष देविदास राठोड आणि त्यांच्या सहकार्‍यांनी शिष्टमंडळासह अनेकदा भेटून आणि निवेदन देऊन वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण शासनाने तालुक्याच्या आणि विकासाच्या बाबतीत नळदुर्गकरांवर फारच मोठा अन्याय केलेला आहे.
       एकेकाळी जिल्ह्याचे ठिकाण असलेले नळदुर्ग आज एक लहानसे शहर दिसून येते. परिसरातील अनेक ग्रामपंचायतीने नळदुर्गला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी एका ठरावाद्वारे केलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार नरेंद्र बोरगांवकर, तुळजापूर तालुक्याचे आमदार माणिकराव खपले, माजी आ. मधुकरराव चव्हाण, सिद्रामप्पा आलुरे गुरूजी, शिवाजीराव पाटील बाभळगांवकर आणि इतर सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी तालुका मागणीस पाठिंबा दिला आहे.

0 comments:

Post a Comment