Breaking News
Loading...
Monday, November 11, 2013

Info Post
शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थी यादीत चुका झाल्याने लाखो रुपये पाण्यात 
दि. ९ डिसेंबर २००५
नळदुर्ग (प्रतिनिधी) तुळजापूर तहसील कार्यालयाच्यावतीने इंदिरा गांधी, भूमिहीन, संजय गांधी निराहार, श्रावणबाळ (वृद्ध) आदी योजनांतर्गत शासनाकउून लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यास चारितार्थ चालविण्यासाठी म्हणुन मानधन देण्यात येते. त्या यादीत मोठ्या प्रमाणात चुका झाल्यामुळे शासनाचे लाखो रूपये पाण्यात जात आहे. याप्रकरणी तहसीलदार व जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी करुन संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी नागरिकांतुन होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, शासनाने निराधार अपंग, भुमीहिन, वृद्ध नागरिकांना प्रतिमाह ३०० रूपये मानधन देत आहे. परंतु प्रशासन व्यवस्थेत मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळलेला असतानाच तुळजापूर तहसील कार्यालयातील बेजबाबदार कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे वरीज्ञ विविध योजनेतील नळदुर्ग येथील लाभार्थ्यांच्या यादीत अक्षम्य चुका केल्याने शासनाचे लाखो रूपये दर महिन्याला पाण्यात जात आहेत. तर हजारो रूपयांचे भ्रष्टाचार होत असल्याचे बोलले जात आहेत.
       तुळजापूर तालुक्यातील महत्त्वाचे शहर असलेल्या नळदुर्गमधील संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ योजेनतील २३९ लाभार्थी असून यामध्ये अधिकार्‍यांच्या हालगर्जीपणामुळे अनेक चुका झाल्या आहेत. २३९ लाभार्थ्यांमध्ये ४० व्यक्तींचे डबल नाव तर तीनजणांचे तीनवेळा नाव आहेत, असे करुन एखाद्या ४० व्यक्ती जास्त व्यक्ती दर्शवले गेले. तर याच यादीत ३५ स्त्री-पुरूष मयत झाले. जमीनदार १०, एकत्र कुटुंब मुले-मुली, सरकारी नोकरीस असणारे २०, गावातील रहिवासी नसलेले १० तर शहर व परिसरातच नसलेले काही व्यक्ती लाभार्थी आहेत. हा शहरातील आकडा एकशे पंधरा होतो. नळदुर्ग शहरातील लाभार्थी यादीमधील ११ जणांच्या प्रती व्यक्ती तीनशे प्रमाणे हिशोब केल्यास ३४ हजार ५०० रूपये एक महिन्यास तर वर्षाकाठी ४ लाख १४ हजार रूपये शासनाचे यांच्या नावे येतात. ही रक्कम लाभार्थी अस्तित्वात नसताना व डबल नावे असताना येत असल्याने ती कोण उचलते का, शासन दरबारी परत जमा होते, हे मोठे गौडबंगाल आहे.
    विविध योजेनतील लाभार्थ्यांना त्यांच्या नावे आलेली रक्कम राखे स्वरूपात न देता त्यांच्या बँकेतील खात्यावर जमा केली जाते. परंतु या लाभार्थ्यांत बर्‍याच व्यक्ती बोगस असून अनेकांचे बँकेत खातेच नाहीत. ज्यांची खाते आहेत, त्या व्यक्ती अस्तित्वातच नाहीत, तर अनेकांचे एका खाते एका बँकेचे व चेक पाठविले दुसर्‍या बँकेस, असे होत असल्याने या योजनेचा लाभार्थी आलेली रक्कम उचलत नाहीत. यामुळे ही रक्कम बँकेकडून तहसीलला परत पाठविली जाते. एखादा दुसारा लाभार्थी जर पैसे मिळाले नाहीत, म्हणुन तहसीलमध्ये गेल्यास तेथे त्याची दाद घेतली जात नाही, याची चौकशी तहसीलदार व जिल्हाधिकार्‍यांनी लावावी व दोषी अधिकार्‍यांवर तात्काळ निलंबित करून खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. नळदुर्ग शहरातील यादीत मोठ्याप्रमाणात बोगस नावे आहेत. तर तालुक्यातील यादीत किती बोगस नावे असतील हे न उलगडणारे कोडे आहे.

0 comments:

Post a Comment