Breaking News
Loading...
Monday, November 11, 2013

Info Post
ऊस खरेदीच्या नावाने लाखोंचा भ्रष्टाचार
तुळजाभवानी कारखाना गैरव्यवहार
 
                          दि. ९ जून २००६
नळदुर्ग (प्रतिनिधी)
तुळजाभवानी कारखान्यातील गैरव्यवहाराची प्रकरणे उघडकीस येत असतानाच जिल्ह्याबाहेरइील ऊस खरेदीकरण्याच्या नावाखाली कर्मचार्‍यांनी कारखान्याला लाखो रूपयास गंडविल्याचे आणखीन एक प्रकरण उघडकीस आले आहे.
      चालू गळीत हंगामात तुळजापूर तालुक्यात ऊसाची तीव्र टंचाई जाणवत होती. त्यातच तुळजाभवानीने शेतकर्‍याला यापूर्वी ऊसाला कमी भाव दिल्याने व हप्ता वेळेवर न दिल्याने ऊसउत्पादक शेतकरी कारखान्यास ऊस देण्यास नाखूष होता. जिल्ह्याबाहेरील जास्त भाव देणार्‍या कारखान्यांना ऊस देण्याकडे शेतकर्‍यांचा कल होता. त्यातच तुळजाभवानी कारखाना अगोदरच तीन वर्षांपासुन बंद असल्याने तो पुन्हा चालू करणे हे संचालकासमोरील आव्हान होते. याकरिता संचालक मंडळांनी कारखान्यास ऊस कमी पडत असल्यास तो बाहेरून आणून तुळजापूर तालुक्यात ८१ हजार मे.टन ऊस निघाला. मात्र तो कमी पडू लागल्याने संचालक मंडळाच्या आदेशाने शेतकी विभागाने आपले कर्मचारी आळंद, इंडी, अफजलपूर, मैंदर्गी, आलमेल, गुलबर्गा आदी ठिकाणी पाठवून ऊस खरेदी करणे सुरू केले. याचाच फायदा काही कर्मचार्‍यांनी उठवला. कारखान्याचे होत जोपासण्यापेक्षा संचालक मंडळास व प्रशासनास अंधारात ठेवून ४२ हजार मे. टन ऊस खरेदी केला. त्यात बराचसा ऊस केवळ सहा महिन्यांचा व कवळा होता. त्यामुळे कारखान्याची रिकव्हरी १२ वरून एकदम ६ वर आली. त्यामुळे संचालक मंडळास जबरदस्त हादरा बसला व त्याची चौकशी सुरू केली. त्यातूनच शेतकरी विभागातील अनेक किस्से बाहेर आले.
       शेती विभागतील कर्मचारी रजपूत हे ही ऊस खरेदी करीत होते. मात्र तो कर्नाटकातील नव्हे तर नळदुर्ग जवळील रामतीर्थ येथील. ऊस आणूनही तो कर्नाटकातील भुसनूर येथून आणल्याचे कारखान्यास सांगून बील उचलण्याचा प्रयत्नही गाडी मालक बाबू पवार यांनी केल्यास किस्सा उघउकीस आला. तसेच मोतीराम राठोड, राजाराम ओव्हाळ या दोन शेतकर्‍यांनीही अत्यंत कोवळा ऊस घातल्याचे उघडकीस आले. या प्रकारामुळे कारखान्याची रिकव्हरी एकदम सहावर आल्याने कारखाना मार्चपर्यंत चालवण्याऐवजी फेब्रुवारीतच कारखाना बंद करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. मात्र याचा फटका आधीच तोट्यात असलेल्या तुळजाभवानी कारखान्यास बसल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. या सर्व प्रकरणाला जबाबदार असणार्‍यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी सभासदांतून केली जात आहे.

0 comments:

Post a Comment