Breaking News
Loading...
Monday, November 11, 2013

Info Post
साखर घोटाळ्यांशी संचालक मंडळाचा संबंध नाही : आलुरे
तुळजाभवानी कारखाना गैरव्यवहार
दि. १३ जुन २००६
नळदुर्ग (प्रतिनिधी) तुळजाभवानी साखर कारखान्यातील तीस लाख रूपयांच्या साखर घोटाळा प्रकरणी दोघा कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली असून या कर्मचार्‍यांचा कारखान्यांच्या संचालकांशी कसलाच संबंध नसल्याची माहिती चेअरमन सि.ना. आलुरे गुरूजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
       गेल्या पंधरा दिवसांपासुन सुरू असलेल्या घोटाळा प्रकरणी ११ रोजी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे स्थानिक शाखा अधिकारी अजित भागवत व तुळजाभवानीचे गोडाऊन किपरन महेश मोटे यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने दोघांनाही १९ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर तुळजाभवानी साखर कारखान्याच्या संचालक मंडहाने कारखान्याच्याच विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेवून याप्रकरणसी त्यांची भूमिका जाहीर केली. या बैठकीस तुळजाभवानी कारखान्याचे चेअरमन सि.ना. आलुरे, व्हा. चेअरमन नरेंद्र बोरगांवकर यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
        यावेळी आलुरे गुरूजी म्हणाले की, या साखर घोटाळ्याशी आमच्या संचालक मंडळातील कोणत्याही संचालकाचा त्यांच्या नातेवाईकांचा चेअरमन, व्हा. चेअरमन याचा या प्रकरणातील आरोपींशी काडीचाही संबंध नाही. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यास आम्ही पाठीशी घालणार नाही. यामध्ये ज्यांचा संबंध आहे, त्यांची नावे पोलिस चौकशीत समोर येतीलच. या संबंधित गोडाऊन किपर महेश मोटे यास कामावरून निलंबित केले आहे. तर शेतकी विभागातील चार कर्मचार्‍यांवर दिवाणी व फौजदारी न्यायालयात केसेस केल्या आहेत. तर कारखान्याची फसवणूक केल्याप्रकरणी शेतकीचा एक कर्मचारी व ट्रक ड्रायव्हर मालकावर केसस करणार आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील सर्वच कारखान्यांना ऊसतोड मजुरांचा फटका बसला आहे. संपुर्ण राज्यातील एकूण ३२ कारखान्यांच्या ३८० केसेस नयायालयात दाखल केलेल्या असून त्यापैकी ८५ केसेसच्या निकाल लागला आहे. अद्याप २१५ केसेस प्रलंबित आहेत. त्यापैकी ६ कोटी २५ लाख रूपये वसूल झाले तर अद्याप ३.२५ कोटी जमा केली आहे. प्रत्येकावर कारवाई केली आहे. कोणालाही सोडले नाही. केंद्र सरकारने कारखान्याची लेव्ही साखर फ्री सेलमध्ये विकू दिली नाही. यामुळे कारखान्यास व्याजाचा फटका बसला तो ८ कोटीचा, आम्ही केंद्रसरकारला कळविले आहे की, यास जबाबदार केंद्र सरकार असून कारखाना हा भुर्दंड सहन करणार नाही. शेतकी विभागाने कामगारांना दिलेली उचल वसूल करण्यात येत आहे. न्यायालयात ३१५ जणांवर केसेस केले आहेत. त्यापैकी २८० आरोपी हजर झाले. तर हजर होवून गैरहजार राहणारे २४७ जणांवर वॉरंट काढले आहे आणि ३४ जणांवर समन्स बजावले आहे. २० जण सतत गैरहजर राहत असून त्यांची चौकशी सुरू आहे. बाहेरून ऊस वाहतुक करीत असता परिसरातील सचर्वच कारखान्यांनी वाहतूक खर्च पूर्ण द्यावा, असे ठराव घेत आहेत. त्यामुळे कर्नाटकातून जो ऊस आला त्याचे वाहतूक बिल द्यावे लागले, ऊसाच्या दुसर्‍या हप्त्याविषयी नरेंद्र बोरगांवकर म्हणाले की, काही शेतकर्‍यांना दिला असून राहिलेल रक्कम दिली जाईल, असे म्हणाले. या पत्रकार परिषदेस चेअरमन, व्हा. चेअरमनसहीत संचालक शिवदास कांबळे, शिवाजीराव मोरे, अख्तर काझी, मोतीराम चव्हाण, सुभद्राबाई मुळे यांच्यासह कारखान्याचे कार्यकारी मुख्य संचालक अशोक पाटील, यशवंत राठोड, ऍड. शेटे उपस्थित होते.

0 comments:

Post a Comment