Breaking News
Loading...
Monday, November 11, 2013

Info Post
तीस लाखांच्या साखर अपहारप्रकरणी दोघांना अटक
दै. पुढारीच्या वृत्ताचा दणका
तुळजाभवानी कारखाना गैरव्यवहार 
दि. १२ जुन २००६
नळदुर्ग (शिवाजी नाईक) येथील श्री तुळजाभवानी साखर कारखान्यातील तीस लाख रूपयांच्या साखर अपहार प्रकरणीशाखाधिकारी अजित भागवत व गोडाऊन किपर मोहन मोटे यांना आज अटक करण्यात आली.
येथील तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्यात सुमारे ३० लाख रूपयांची १७४९ पोती साखर ही चोरून विकल्याचे प्रकरण प्रथम दै. पुढारी मधून प्रकाशित होताच याप्रकरणी गेल्या पंधरा दिवसांपासुन शेतकरी, सभासद व नागरिकांतुन तीव्र संताप व्यक्त होत होता. तर उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे प्रकरण कसे हाताळते, याकडे लक्ष लागले होते. प्रसारमाध्यमांपुढे बँक प्रशासकास नमती भूमिका घ्यावी लागली. या प्रकरणातील दोघांवर गुन्हा दाखल करावा लागला. १० जून रोजी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेतील बिगरशेती विभागाचे मुख्याधिकारी हणमंत विश्‍वंभर भुसारे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
         उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कारखाना शाखेतील शाखाधिकारी ए.पी. भागवत व कारखान्यातील गोडाऊन कीपर एम.डी. मोटे यांनी संगनमत करून १ मे ते ३० मे २००६ दरम्यान तुळजाभवानी कारखान्याच्या गोडाऊन क्रमांक ३ मधुल ३ हजार ८८ पोत्यापैकी १७४९ पोती साखरेचा अपहार केला. याची अंदाजहे किंमत २९ लाख ७३ रूपये आहे. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तुळजाभवानी कारखान्यास दिलेल्या कर्जाच्या तारणापोटी साखर बँकेकडे होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फौजदार राजेंद्र कदम तपास करीत आहेत. तुळजाभवानीतील भ्रष्टाचाराप्रकरणी दै. पुढारी मधून सतत आठ दिवसांपासुन मालिका सुरू होती. केंद्रीय उत्पादन शुल्क, लातूर व विशेष लेखा परीक्षकांनी ३१ मार्च रोजी केलेल्या तपासणी अहवाल कसा केला? एवढे मोठे प्रकरण त्यांच्या लक्षात कसे आले नाही? याबाबत परिसरातुन तर्कवितर्क लढविले जात आहेत.

0 comments:

Post a Comment