Breaking News
Loading...
Monday, November 11, 2013

Info Post
ऊस तोडणी, वाहतुकीसाठी उचललेल्या पैशातून कर्मचार्‍यांनी ४० लाखाला गंडविले
तुळजाभवानी कारखाना गैरव्यवहार 
                           दि. ६ जून २००६
नळदुर्ग (शिवाजी नाईक)
तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या शेतकी विभागातील कर्मचार्‍यांनी चालू गळीत हंगामातऊसतोडणी व ऊस वाहतुकीसाठी उचलेल्या पैशांतुन कारखान्याला ४० लाख रूपयांना गंडविल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आल्याने शेतकर्‍यांतून संताप व्यक्त होत आहे.
     सोमवारीच उघडकीस आलेल्या ३० लाख रूपयांच्या साखर घोटाळ्यानंतर आज पुन्हा कारखान्यातील शेतकी विभागातील कर्मचार्‍यांनी केलेला ४० लाख रूपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. यामुळे सहकार क्षेत्राला जबरदस्त हदरा बसला आहे.
         कारखान्याच्या सन २००५-०६ या चालू गळीत हंगामाकरिता ऊसवाहतूक व ऊसतोडणीसाठी कारखान्याने शेतकी विभागातील अधिकार्‍यांकडे दीड कोटी रूपये रक्कम दिली होती. संबंधित अधिकार्‍यांनी १२५ टोळ्यांची शिफारस कारखान्याकडे करून एका टोळीस वाहतुकीसह सव्वा लाख रूपये याप्रमाणे कारखान्यास पुरविण्याच्या जबाबदारीवर उचलेले होते. यापैकी चालू गळीत हंगामात नगर, परभणी, बीड, मुखेड येथुन शेतकी विभागाच्या अधिकार्‍यांनी केवळ ९० ऊस तोडणीच्या टोळ्या कारखान्यास पुरविल्या. मात्र यातुन उरलेली ४० लाख रूपये रक्कम कारखान्याकडे जमा करायला हवी होती. मात्र गळीत हंगाम संपून तीन महिने उलटून गेले तरी अद्याप ही रक्कम या अधिकार्‍यांनी कारखान्याकडे जमा न करता हडप केल्याचे उघडकीस आले. यातील मुख्य शेतकी अधिकारी एम.बी. पाटील यांच्याकडे १५ लाख रुपये, अतिरिक्त शेतकी अधिकारी ए.जी.मुंदगुडके यांच्याकडे १२ लाख ५१ हजार ८७१ रुपये, एम.आर. मुळे यांच्याकडे ७ लाख ९१ हजार ३५२ रूपये, तर व्ही.व्ही. जाधव यांच्याकडे ४ लाख ६१ हजार ७७१ रूपये याप्रमाणे ४० लाख ४ हजार ९९४ रूपये रक्कम अद्याप येणे आहे. तर याच शेतकी विभागातून गळीत हंगाम २००१-०२ मध्ये याच कामासाठी उचलेल्या रक्कमेपैकी ६० लाख रूपये रक्कम हडप केली गेली असल्याचे माहिी उघडकीस आली आहे. पूर्वीच्या हंगामातील ६० लाख रूपये रक्कम शेतकी विभागाच्या कर्मचार्‍यांकडे असताना याबाबत कारखाना प्रशासनाने पुन्हा इतकी मोठी रक्कम कशी दिली? ती कर्मचार्‍यणांना दिली गेली की त्यांचे नावे पुढे करून संचालकांनी हडप केली? त्यांच्यावर कारखान्याने अद्याप कारवाई का केली नाही? असे अनेक संतप्त सवाल सभासदातून केले जात आहेत. तुळजाभवानी साखर कारखान्यात वारंवार होत असलेल्या घोटाळ्यांची सहकार आयुक्त दखल घेवून दोषींवर कारवाई करतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 comments:

Post a Comment