Breaking News
Loading...
Monday, November 11, 2013

Info Post
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक मोरे यांच्या कारवाईकडे लक्ष
तुळजाभवानी कारखाना गैरव्यवहार
दि. १० जून २००६
नळदुर्ग (शिवाजी नाईक) नळदुर्ग येथील तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्यातील तीस लाख रूपयांचे साखर घोटाळा प्रकरण हे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक श्रीकांत मोरे बासनात गुंडाळणार का त्याचा छड लावणार? याबाबत सर्वत्र उत्सुकता पणाला लागली असून, तुळजाभवानीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी सभासदातून केली जात आहे.
       येथील तुळजाभवानी साखर कारखान्यात १७४९ पोती साखर काळ्या बाजारात विकल्याचे प्रकरण उघडकीस येऊन पंधरा दिवसाचा कालावधी उलटला तरी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस याप्रकरणी लक्ष देण्यास मिळत नसल्याने व बँकेने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नसल्याने नागरिकांतुन बँक प्रशासनाबाबत संताप व्यक्त होत आहे. याबाबत बँकेचे प्रशासक मोरे यांच्याशी सतत संपर्क करण्यात प्रयत्न केला असता, त्यांची प्रत्यक्षात अथवा दूरध्वनी किवा भ्रमण ध्वनीवरही भेट झाली नाही. बँकेतील बिगर शेती विभागातील एच.व्ही. भुसारे यांची भेट घेतली असता ते म्हणाले की, साखार पासणीचे कोणतेही आदेश मला बँकेने दिलेले नव्हते. परंतु माझी जबाबदारी म्हणुन मी जातीने या प्रकरणी लक्ष दिले व पंचनामा भरून माझा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला. आता या प्रकरणी कोणतीही कारवाई करायचे ते प्रशासकीय अधिकारी श्रीकांत मोरे यांच्यावर अवलंबून असल्याने त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
      उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ताब्यात नाबार्ड अंतर्गत कारखान्यास दिलेल्या ३४ कोटी रूपयांच्या कर्जापोटी बँकेकडे नजर गहाण ठेवलेली साखर असून, त्याची जबाबदारी ठेवलेली साखर असून त्याची जबाबदारी बँकेवर असतानाही याप्रकरणाची चौकशी करण्यास बँक प्रशासक कचरत असून, राजकीय दबावाला बळी पडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्नात असल्याचे याबाबत होत असलेल्या दिरंगावरून दिसून येत आहे. याप्रकरणी प्रशासक श्रीकांत मोरे यांच्याशी अनेकवेळा भेटण्याचा प्रयत्न करूनही त्यांचा ठावठकाणा लागून शकला नाही. भ्रमणध्वनीवर त्यांच्याशी संपर्क झालाच तर मी सध्या परगावी आहे, हे उत्तर ठरलेले आहे.

0 comments:

Post a Comment