Breaking News
Loading...
Monday, November 11, 2013

Info Post
शेतकी विभागाच्या चार कर्मचार्‍यांना अटक 
दि. २३ जून २००६
नळदुर्ग (प्रतिनिधी) श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील शेतकी विभागाच्या चार कर्मचार्‍यांनी कारखार्‍यांची ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेसाठी अयोग्य व्यक्तींची शिफारस करून फसवणूक केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात न्यायालयीन आदेशाने गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानुसार नळुदर्ग पोलिसांनी चार जणांना अटक केली.
      नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्यात गेल्याच आठवड्यात १७४९ पोती साखर घोटाळ्या पाठोपाठ शेतकी विभागातील चालू गळीत हंगाम २००५ करिता ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणेकरिता कारखान्याने शेतकी विभागाच्या कर्मचार्‍यांवर जबाबदारी सोपवली होती परंतु शेतकी विभागाच्या कर्मचार्‍यांनी जबाबदारीचे भान न भेवता त्यांच्यावर विश्वासाने सोपविलेल्या कामामध्ये जाणुनबुजून हेतपुरस्सरपणे हयगय केली व चुकीच्या व्यक्तीची शिफारस केली. त्यांच्या शिफारसीवरून कारखान्यास चाळीस लाख रूपयांचे नुकसान झाले. यामध्ये एम.बी. पाटील यांनी १५ लाख रूपये, मुदगुडे ए.जी. यांनी १२ लाख ५१ हजार ८७१ रूपये, एम.आर. मुळे ७ लाख १९ हजार ३५२ रूपये तर व्ही.व्ही. जाधव यांनी ४ लाख ६१ हजार ७७१ रूपये प्रमाणे नुकसान केले. चारहीजण तुळजाभवानी साखर कारखान्यातीलच कर्मचारी आहेत. अशी फिर्याद तुळजाभवान शेतकरी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्यावतीने रमेश मुरलीधर उंबरे यांनी न्यायालयामार्फत कारवाई केल्याने नळदुर्ग पोलीस ठाण्यात वरील चौघांवर गुन्हा नोंदविण्यात आला. वरील सर्वांना २० रोजी अटक करण्यात आली. याचा तपास नळदुर्ग पोलीस ठाण्यातील राजेंद्र बोकडे हे करीत आहेत.

0 comments:

Post a Comment