Breaking News
Loading...
Sunday, November 10, 2013

Info Post
कारगीलमध्ये पाक पराभूत झाला असला तरी युद्धाचा धोका कायम - मुजफ्फर हुसेन
                                                                             दि. २३ सप्टेंबर १९९९
नळदुर्ग, दि. २२ (वार्ताहर) : भारत देशावर आक्रमण करण्यासाठी पाकिस्तानने मागील तिन्ही वेळेस सप्टेंबर ते डिसेंबर हा काळ निवडला असून कॅलेंडरवर हा कालावधी सुरू झाला असल्याने या दरम्यान युद्ध भडकण्याची शक्यता असल्याचा सुतोवाच प्रख्यात ज्येष्ठ पत्रकार व लेखक मुझफर हुसेन यांनी नळुदर्ग येथील अणदूर येथे गणेशोत्सव व्याख्यानमालेत केला.
        भारताविरूद्धच्या ‘जेहाद’ मध्ये पाक अतिरेक्यांनी सामील व्हावे, असे ओबामा बिन लादेन यानी नुकतेच आवाहन केले असून यावर त्यांनी बोलताना सांगितले की, जेहाद (धर्मयुद्ध) म्हणजे काय हे त्याला अवगत नसावे, त्या लादेनला इस्लाम धर्माची ए.बी.सी.डी. सुद्धा माहीत नाही. अशी टीका करुन त्यांनी सांगितले, कारगील युद्धात पाकने माघार घेतली असली तरी अजूनही पराभवाची आग पाकिस्तानच्या पोटात उसळत असून त्याचा स्फोट होण्याची शक्यता आहे. मागील वेळी पाकिस्तानने जेेव्हा भारतावर आक्रमण केले तो कालावधी सप्टेंबर ते डिसेंबर हाच होता आणि या कालावधीला सुरूवात झाली असून पाकिस्तानची संपूर्ण जगात झालेली नाचक्की त्या देशाला पुन्हा युद्धा भडकावण्याची संधी देत आहे. श्रीमती इंदिरा गांधीनी पहिल्यांदा अणुस्फोट करुन अनेक भारतीय पुर्वजांचे अधुरे कार्य पूर्ण केले असल्याचे सांगून मुझपर हुसेन पुढे म्हणाले की, देशातील राष्ट्रवादी  ताकद मजबूत झाल्याशिवाय आपण समर्थ व सक्षम राष्ट्र म्हणुन उभे राहू शकत नाही.
        पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी युद्धखोर पाकिस्तानशी मैत्रीचे संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अटलजींची लाहोर बस यात्रा व लाहोर समझोता भारताने प्रामाणिक भावनेने केला. परंतु पाकिस्तानने या संधीचा गैर फायदा घेतला.
माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री, पंडित शामा, प्रसाद मुखर्जी यांचा परकीय राष्ट्रांनी मोठ्या कपटाने गुढरित्या अंत केला. परंतु आजपर्यंतच्या एकाही सरकारने याबद्दल चौकशी आयोग नेमला नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
         कारगील युद्ध ज्या परिस्थितीत छोडले गेले ती परिस्थिती वातावरण अत्यंत खराब होते. शुन्य अंशाच्या आत साठ अंशापर्यंतच्या थंड तापमानात मनुष्याला अनेक रोग होतात. हायपर थर्मिया यात माणसाच्या शरिरातील तापमान घटून मृत्यू होतो. तर सेरिबल एडियामुळे डोक्यात पाणी होते. पलमरी एडियामध्ये फुफूसात पाणी भरून मृत्यु येतो. फ्रास्ट बाइट यात रूग्णाचे अंग, बोटे गळून जाते. अशा वातावरणात १६ हजार मीटर उंचीवर असलेला पाक सैनिकांना हुसकावून लावुन भारतीय सैनिकांनी शौर्याचा इतिहास लिहिला. असे त्यांनी शेवटी सांगितले. ‘कारगील युद्ध आणि भारत-पाक संबंध’ या विषयावर येथील विघ्नहर्ता सार्वजनिक गणेश मंडळाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत हुसेन यांनी बोलले. व्याख्यानमालेत हुसेन यांनी बोलले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. ब्याळे सर होते. कार्यक्रमाचे प्रारंभी श्री खंडोबाची प्रतिमा देऊन मंडळाचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र कानडे हुसेन यांचे स्वागत केले. कारगील येथे यशस्वी कामगिरी केलेल्या बलभीम घोडके या जवानाचे शहरातून मिरवणूक काढुन हुसेन यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या रांगोळी, बुद्धीबळ व इतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.

0 comments:

Post a Comment