Breaking News
Loading...
Monday, November 11, 2013

Info Post
पाटील तांड्याची शून्यातून विश्वनिर्मिती...
वाटा विकासाच्या... भाग-३
                                                                            दि. २३ डिसेंबर २००५
नळदुर्ग (शिवाजी नाईक) एका वर्षापूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी... व्यसनाची धुंद असलेल्या पाटील तांड्याने शून्यातून विश्वनिर्मिती केली. अज्ञान, दारिद्रय, व्यसनधिनता, अडचणी सर्वांवर मात करीत या ५५ कुटुंबाच्या छोट्या गावांनी आदर्शाचा एकच संकल्पच केला. लोकसहभागातून आपल्या गावचा संपूर्ण विकास करणारे मराठवाड्यातीलच काय अखंड देशातील हे गाव असावे, इतकी भरारी या गावांनी केली आहे. येथील कामाचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. कृष्णा भोगे यांनीही घेतला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य जलस्वराज्य प्रकल्पाच्या मुख्य माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ श्रीमती अश्‍विनी जठार यांच्यासमवेत राज्यातील २६ जिल्ह्याचे माहिती, शिक्षण संवाद तज्ज्ञांच्या एका पथकाने ११ नोव्हेंबर रोजी भेट दिली. 
      पाटील तांडा येथील एक अभ्यास सहलही अण्णा हजारे यांनी विकसित केलेल्या राळेगणसिद्धी व हिरवे बाजार (जि. नगर) येथे भेट देऊन माहिती मिळविली. त्याचप्रमाणे या गावाच्यावतीने एक पथक श्रीलंका देशात जाऊन तेथील विकासाची पाहणी व अभ्या करुन परतले आहे. तसचे पाटील तांडा येथील सतीश राठोड या युवकासह जि.प. चे जलस्वराज्य अधिकारी रमाकांत गायकवाउ व त्यांच्या सहकार्यांनी देहू ते पंढरपूर पायी निघालेल्या दिंडीतत वारकर्‍यांना सतत १८ दिवस संपूर्ण स्वच्छता अभियान व जलस्वराज्य प्रकल्पाविषयी निवासी राहून माहिती देवुन जनजागरण करण्याचा प्रयत्न केले. त्याचबरोबर बचत गटातील दहा महिलांनी जिल्हास्तरीय पाककलेतील स्पर्धेत पारितोशिक मिळविले असून परभणी येथील कृषी विद्यापीठात आयोजित कृषी मेळाव्यात या महिलांनी सतत तीन दिवस राहून, स्टॉल (हॉटेल) यांच्या माध्यमातुन मेळाव्यात आलेल्या शेतकर्‍यांना उत्कृष्ट भोजन व फराळ, चहा पाण्याची उल्लेखनिय सोय उपलब्ध केली होती. याची दखल घेऊन विभागीय आयुक्त डॉ. कृष्णाभोगे यांनी सन्मानपत्र देऊन या महिलांचा गौरव केला आहे.
       पाटील तांडा याठिकाणी शिवकालीन योजनेंतर्गत सभागृह, शाळा कार्यालय, पाण्याची टाकी या छतावरील पाणी एकत्र करुन हातपंपाचे पुनर्भरण केले आहे. तर दीड लाख रूपये लोकवाटा निर्माण करुन जवळपास १० लाखाचे सुशोभित मंगलकार्यालय उभारण्याचा ग्रामस्थांचा मनोदय आहे. या गावातील अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामासाठी ८ लाख ५० हजार रूपयांचे तांडा सुधार योजनेंतर्गत मजुरीच्या मार्गावर आहे. दारिद्रयरेषेखालील बचत गटाना बंदिस्त शेळीपालन प्रकल्पासाठी ४ लाख ५० हजार रूपयांचा प्रकल्प तयार केला असून तो मंजुरीच्या मार्गावर आहे.
      ज्याप्रमाणे देव आणि दानवामध्ये घनघोर युद्ध झाले. त्यांनी केलेल्या सागर मंथनातुन अमृत, हिरे, माणके कलश उदयास आले. परंतु पाटील तांड्यातील या लोकांनी गूळ व नवसागर मंथनातून बाहेर पडून गावाच्या प्रगतीचा मंगल कलश उदयास आणला आहे. त्याचा आदर्श महाराष्ट्रातील प्रत्येक अविकसित गावानी घ्यावा, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

0 comments:

Post a Comment