Breaking News
Loading...
Monday, November 11, 2013

Info Post
पाटील तांडा मराठवाड्यातील ५५ कुटुंबाचे एक ‘आदर्श गाव’
वाटा विकासाच्या... भाग-१ 
दि. २१ डिसेंबर २००५
नळदुर्ग (शिवाजी नाईक) गुन्हेगार पार्श्‍वभूमी असलेला व्यवसनांमध्ये वर्षानुवर्षे बुडालेला मराठवाड्यातील तुुळजापूर तालुक्यातील ‘पाटील तांडा’ या ५५ कुटुंबाच्या गावाने आजघडीला कुतुहल वाटावी, अशी आश्‍चर्यकारक प्रगती केली आहे. डोंगराळ भागातील बंजारा वस्तीच्या या पाटील तांड्यावर आज विकास गंगा वाहत आहे. मराठवाड्यातील ५५ कुटुंबाचे एक ‘आदर्श गाव’ म्हणुन हे गाव नावलौकिक मिळवत आहे.
स्चछता ग्राम योजना, जलस्वराज्य योजना, आदर्श गाव योजना, बचतगट या माध्यमातुन लोकांना सकारात्मक कार्यात सक्रिय करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. याचा फायदा घेत उस्मानाबाद जिल्ह्यातील पाटील तांड्याने (ता. तुळजापूर) चित्र पालटून टाकले आहे.
     जेमतेम ५५ कुटुंबाची वस्ती असलेला हा तांडा. वर्षानुवर्षे दरमहा हातभट्टी दारु व्यवसायात लाखो रूपयांची उलाढाल करीत असे. त्यातच तांड्याचा नावलौकिक होता. दिवस-रात्र गुळ व नवसागर आणि पेटलेल्या भट्‌ट्या, प्रचंडे धुराचे लोट, हातभट्टी दारुचा उग्रवास, महिना दोन महिन्याला त्या ठिकाणी पडणारा पोलिस गराडा, असं चित्र तांड्यावर दिसत होतं. प्रत्येक कुटुंब व्यवसनाधीनता आणि गुन्हेगारीकडे वळल्याने विकास नावाच शब्दच तेथील गावकर्‍यांना माहितच नव्हता.
      स्वातंत्र्याला ५७ वर्ष झाली होती. तरीही या तांड्याकडे कोणीही शासकीय अधिकारी पोहोचलेस नव्हते. रस्ता, आरोग्याच्या सुविधा, पाणीपुरवठा योजना, शासकीय योजना याची ओळखही पाटील तांड्याला नव्हती. मात्र पोलिसांची करडी नजर होती. एकंदरीत या गावाची रोजीरोटी हातभट्टीवर चालत असे. स्वातंत्र्याच्या ५८ व्या वर्षानंतर आज येथील चित्र पूर्णत: पालटले आहे. विविध योजना आणि विकासाच्या योजनेतून गावाला ‘गावपण’ मिळवून देण्यात अखेर गावकरी श्रेष्ठ ठरले. विशेष म्हणजे पाटील तांडा हे आजमितीला जलस्वराज्य प्रकल्पाचे राज्यातील एक अभ्यास केंद्र बनले आहे.  गेल्या वर्षभरात राज्य शासनाने लक्ष वेधून घेण्याची कामगिरी या पाटील तांड्याने केली असून शासनाच्या विविध योजना या ठिकाणी आता नव्याने राबविल्या जात आहेत.
      जलस्वराज्य प्रकल्पाच शुभारंभ मुंबई येथे तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या उपस्थितीत दोन वर्षापूर्वी पार पडला. त्यावेळी पाटील तांड्यातील काही लोक मुंबई येथे कार्यक्रमासाठी उपस्थित होते. हा कार्यक्रम आणि जलस्वराज्य प्रकल्पाची माहिती घेवून प्रभावित झालेले गावकरी सरळ अधिकार्‍यांशी चर्चा करुन विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी हात पुढे केला. अर्धात मागणार्‍याला द्यावे, या हेतुने शासनाची पाटील तांड्याकडे योजनेची नदी सोडून दिली. येथुनच सत्कार्याचा मंगल कलश घेऊन, लोकसहभागाच्या ताकदीने विकासाला प्रारंभ केला.

0 comments:

Post a Comment