Breaking News
Loading...
Monday, November 11, 2013

Info Post
दोषींना पाठीशी घालणार नाही : आलुरे
तुळजाभवानी कारखाना गैरव्यवहार
दि. ७ जुन २००६
नळदुर्ग (प्रतिनिधी)
तुळजाभवानी साखर कारखान्यात गेल्या दोन महिन्यांपासुन कर्मचवार्‍यांना वाईट सवयी लागल्याने चोरीसारखेगैरप्रकार होत असून यामधील दोषी आढळणार्‍या कर्मचार्‍यांना कदापि पाठीशी घालणार नाही, असे कारखान्याचे अध्यक्ष सि.ना. आलुरे गुरूजी यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.
       नळदुर्ग येथील तुळजाभवानी साखर कारखान्यणातील तीस लाख रूपयांचा साखर घोटाळा उघडकीस आला आहे. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी कर्मचार्‍यांनी ऊसतोडणी व ऊसवाहतुकीसाठी उचलेल्या पैशातुन कारखान्याला चाळीस लाखाला गंडविल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याविषयी कारखान्याचे अध्यक्ष सि.ना. आलुरे गुरूजी यांच्याशी संपर्क साधला असता, ते बोलत होते.
        आलुरे गुरूजी यांनी सांगितले की, तुळजाभवानी कारखान्यात गेल्या दोन दिवसांपासुन घडलेल्या प्रकाराची माझ्याकडके सविस्तर माहिती नसल्याने त्याबाबत जास्त काही बोलणे उचित ठरणारे नसून उस्मानबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे तुळजाभवानी कारखान्याची साखर तारण ठेवली असताना या प्रकरणाला मुख्यत: तेच जबाबदार असून त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही, म्हणुन बँकेने अंग झटकण्या प्रयत्न करू नये. साखर चोरी झालेल्या गोडाऊनची एक चावी बँकेकडे तर एक चावी कारखान्याकडे असते. यामुळे ही जबाबदार बँकेच्या अधिकार्‍यांवर येते. शेवटी कारखान्याचे संचालक काय गोडाऊन राखत बसणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कारखान्याची शेतकी विभागातील कर्मचार्‍यांने ४० लाख रूपयांची उचल केली असून त्यांच्याकडून अद्याप रक्कम वसूल व्हायची आहे. ती रक्कम त्वरित जमा न केल्यास त्यांच्यावर संचालक मंडळ कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तुळजापूर तालुक्यात आपणच उभा केलेला कारखाना बंद पडू नये, म्हणुन केंद्र सरकारकडून शर्तीचे प्रयत्न करून ३४ कोटी रूपयांचे पॅकेज मंजूर करून आणून कारखाना सुरू केला. मात्र कर्मचार्‍यांच्या वाईट सवयींमुळे कारखान्यावर पुन्हा कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे, असेही त्यांनी त्यावेळी सांगितले.

0 comments:

Post a Comment