Breaking News
Loading...
Monday, November 11, 2013

Info Post
नळदुर्गवासियांच्या भावना युती शासन जाणणार की नाही ?
                                                                                   दि. १७ मे १९९९
(शिवाजी नाईक यांजकडून)
     महाराष्ट्र शासनाने नवे २८ तालुका जाहीर केले असून गेल्या ४० वर्शापासून पाठपुरावा करूनही इतिहास प्रसिध्द नळदुर्ग शहराला तालुका निर्मितीच्या यादीतून वगळल्याने नळदुर्गकरांनी हिंसक पध्दतीने आंदोलन सुरू केले. मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नळदर्गलाडावलल्याच्या निशेधार्थ दि. १३ एप्रिल १९ रोजी नळदुर्गमध्ये अभ्ाूतपूर्व आंदोलन झाले . आंदोलन करत असताना भजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ नेते व शहर भाजपाचे माजी अध्यक्ष विरेशप्पा डोंबे यांचा आकस्मिक मृत्यू झाला. राज्य शासनाने नळदुर्ग वासियांच्या भावनेची कदर करून ऐतिहासिक नळदुर्गला तालुक्याचा दर्जा देण्याबद्दल युती शासनाकडून नळदुर्ग व परिसारातील नागरिकांच्या अपेक्षा मोठया आहेत.
     नळदुर्ग तालुका निर्मितीबाबत गेल्या ४० वर्षापासून परिसरातील जनता लढा देत आहे. तत्कालिन मुख्यमंष्यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे. दि.२७ मार्च ८६, २ फेब्रवारी ८८, १९ जुलै ६५,२१ फेब्रवारी ८३, २७ मे ८५, १ जुलै ८६, २८ जुलै ८८, २१ ऑगस्ट ९२, १५ एप्रिल ९९. या तारखांना तत्कालिन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शरद पवार, सुधाकरराव नाईक, ए.आर.अंतुले, नारायणरावजी राणे या सर्वांना निवेदन देण्यात आले.लोकशाहीची संकल्पना कोणत्याही हिंसाचारी उठावाला मान्यता देत नसते. राज्यकर्त्यांनी लोकशाहीचा हा संकेत बिनधोक राहाण्याच्या दृष्टीने जनमत प्रक्षुबध्द होण्यापूर्वी स्वतंत्र नळदुर्ग तालुका साकार करावा अशी मागणी नळदुर्ग शहर व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
       नळदुर्ग शहर बालाघाट डोंगराच्या कुशीत मुंबई-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले निसर्गरम्य व ऐतिहासिक अशी वैभवशाली परंपरा असलेले शहर आहे. नळदुर्गचा किल्ला व पाणी महाल या दोन ऐतिहासिक गोष्टी नळदुर्गचे महत्त्व पटवून देण्यास पुरेशा आहेत. ऐतिहासिक काळात नळदुर्गच्या परिसराला सुभा दर्जा होता. गेल्या काही वर्षात कृषी औद्योगिक क्रांतीच्या संदर्भात या भागातील पाणी पुरवठयाचा विकास तालुक्याच्या निर्मितीला वरदान ठरला आहे. सोलापूरचे अनेक उद्योजक यापरिसरामध्ये लहान-मोठे अनेक उद्योगधंदे कारखाने काढण्यास तयार आहेत. सि.ना. आलुरे गुरूजी, मधुकरराव चव्हाण यांनी तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना भागिरथ खत कारखाना व खंडोबा सहकारी पणन संस्था उभा करून नळदुर्ग तालुक्याच्या निर्मितीला औद्योगिक विकासाची पुस्ती जोडली आहे. नियोजित नळदुर्ग तालुका संबंध उस्मानाबाद जिल्हयातील नव्हे तर महाराष्ट्रात सर्व दृष्टीने आघाडीवर राहणारा तालुका होऊ शकेल अशी क्षमता नळदुर्गच्या परिसरात आहे. अनेक स्वातंत्र सैनिकांचा वारसा या शहराला व परिसराला आहे. हुतात्मा बाबुराव बोरगावकर यांनी स्वातंष्यसैनिक म्हणून जे बलिदान केले ते कोणलाही कधीही विसरता येणार नाही.
       अगदी अलिकडच्या काळापर्यंत नळदुर्ग हे जिल्हयाचे ठिकाण होते व १९५१ पर्यंत नळदुर्गला न्यायालय होते. तालुक्याच्या निर्मितीचे सर्व शासकीय संकेत विचारात घेतले तर तालुक्याची निर्मिती करणे कोणत्याही दृष्टीने उणे पडणारे नाही. उस्मानाबाद जिल्हयाचे विभाजन करून स्वतंत्र लातुर जिल्हा शासनाने निर्माण केला आहे. नळदुर्ग तालुका स्वतंत्र करावा म्हणून सर्व क्षेत्रातील नागरिकांनी अनेक वर्षांपासूनची जुनी मागणी आहे. अनेकवेळा शिष्टमंडळ पाठवून या रास्त मागणीचा पाठपुरावा करण्यात आलेला आहे. चौफेर विकास व महसूल उत्पन्न या दोन्ही कसोटयावर या तालूक्याची निर्मिती सर्व दृष्टीने समर्थनिय ठरणारी आहे. महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच नळदुर्ग तालुक्याची निर्मिती करणे आवश्यक होते.
      बालाघट डोंगराच्या कुशीतील नळदुर्ग शहर ऐतिहासिकदृष्टया सुप्रसिध्द असून मुंबई-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावरील निसर्गरम्य केंद्र आहे. जवळपास मोठया उद्योग व व्यापारी केंद्राशी उदा. सोलापूर, कोल्हापूर अक्कलकोट, उस्मानाबाद, तुळजापूर, लातूर, उमरगा, गुलबर्गा हैद्राबाद, या शहराशी दळणवळणाच्या साधनाने सुलभतेने जोडलेले आहे. आज नळदुर्गमध्ये नगर पालिका, शासकीय विश्रामगृह, पोस्टऑफिॅस, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रसृतिगृह, कुष्ठरोग व मलेरिया केंद्र, पोलिस ठाणे मंडळ निरीक्षक कार्यालय, वाचनालय, दुग्ध उत्पादन संस्था व पुरवठा संघाचे कार्यालय, पशुवैद्यकीय श्रेणी-२, यांचा दवाखाना, सांस्कतिक सभागृह, हुतात्मा स्मारक, दूरध्वनी सेवा, सार्वजनिक तालीम, धर्मषाळा, समाजमंदिर, वित्तीय संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक, श्री. स्वामी समर्थ अर्बन को. ऑप. बँक, वि. का. सेवा सोसा. व इतर पतसंस्था ३३ के. व्ही. म.रा. वि. मंडळाचे उपकेंद्र मृदसंधारण कार्यालय, उपविभागीय ल. पा. कार्यालय, उपविभागीय जलसिंचन कार्यालय, व वसाहत, अभियंता, सां. बा. विभाग, बसस्थानक, शासकीय गोडावून व सहकारी संस्था, कला व वाणिज्य महाविद्यालय असून येथे पदव्युत्तर शिक्षणाची सोय आहे. तसेच संगणक प्रषिक्षण केंद्र अशा प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत.
    शिवाय शहर मोठेमोठ्या बाजारपेठा व उद्योग केंद्र यांच्याशी जोडलेले असङयामुळे नळदुर्ग हे यापरिसरातील जवळपासच्या खेड्यातील जनतेला एक मोठे व्यापारी व मध्यवर्ती ठिकाण आहे. सध्या येथील लोकसंख्या २५ हजारांपेक्षा जास्त असून अनेक वर्षांपासुन येथे नगरपरिषद अस्तित्वात आहे. बोरी धरणामुळे पाणीपुरवठा मुबलक प्रमाणात आहे. सद्यस्थितीत नळदुर्ग हे महत्वाचे मध्यवर्ती ठिकापण आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन नळदुर्ग परिसरातील खेडयात जनतेला स्वतंत्र्य तालुक्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन या मागणीच्या समर्थनासाठी शिष्टमंडळ शासनाला भेटली आहेत. नळदुर्ग नगरपरिषदेने स्वतंत्र नळदुर्ग तालुक्याची मागणी करणारा कै. प्रभाकरराव पुदाले हे नगराध्यक्ष असताना केला होता. या नियोजित तालूक्यातील सुमारे १०० पेक्षा अधिक खेड्याचे ग्रामपंचायतीने ठराव करुन स्वतंत्र नळदुर्ग तालुक्याची मागणी केली आहे. तुळजापूर हे तालुक्याचे ठिकाण नळदुर्ग परिसराला सर्व दृष्टीने गैरसोयीचे असून नळदुर्ग पासुन (३५ किलोमीटर) एका टोकाला पडते. त्यामुळे या परिसरातील सुमारे शंभर खेड्याची मोठ्याप्रमाणात गैरसोय होते. त्यामुळे लोकांचा पैसा व वेळ वाया जातो. नळदुर्ग परिसरातील जनतेला तुळजापूर नळदुर्ग शहर न्यायालयीन, महसूल कार्यासाठी सर्व दृष्टीने सोयीचे आहे.
       नियोजित नळदुर्ग तालुका तुळजापूर तालुक्याचे विभाजन करून उमरगा व अक्कलकोट तालुक्यातील काही गावे जोडून निर्माण करता येण्यासारखा आहे. असा नियोजित नळदुर्ग तालुका नळदुर्ग परिसरातील खेड्यांना सर्व दृष्टीने मध्यवर्ती ठरत आहे. नळदुर्ग तालुका शहरामधून या नियोजित तालुक्यातील १०० खेड्यांना दळणवळणाच्या सर्व सोयी उपलब्ध आहेत. जनतेचा पैसा व वेळ यांची मोठ्याप्रमाणात बचत तसेच गैरसोय दूर होणार असल्याने ही मागणी सर्व दृष्टीने समर्थनीय ठरली आहे. उमरगा तालुक्यातील काही गावे उमरगा शहरास दूर असल्याचे ती नियोजित नळदुर्ग तालुक्याला जोडल्यास कोणतीही हानी होणार नाही. उलट शेष उमरगा तालुका सुटसुटीत व प्रशासनाच्या दृष्टीने कार्यक्षम होईल. उमरगा तालुक्याचे सध्याचे आमदार प्रा. रविंद्र गायकवाड हे सत्ताधारी पक्षाचे असल्याने नळदुर्गचा तालुक्यासंदर्भात विचार केल्यास ते याला निश्‍चितच हिरवा कंदील दाखवतील असा विश्वास नळदुर्ग शहर व परिसरातील जनतेला आहे.
    यापूर्वीच शासनाने या मागणीचा विचार करून ज्या समित्या प्रत्येकवेळी स्वतंत्र नळदुर्ग तालुक्याची शिफारस केली आहे. १९८२ चया अशा चौकशी समितीने पाहणी करून विविध सोयीची उपलब्धता पडताळून पाहिली आहे. इतकेच नव्हे तर जनतेच्या सोयींच्या दृष्टीने स्वतंत्र नळदुर्ग तालुका आवश्यक असल्याची शिफारसही केली आहे. या नियोजित तालुक्यासाठी लागणारी आवश्यक जमीन व इमारत या ठिकाणी उपलब्ध आहे.
     नळदुर्ग नगरपालिका स्वयंपूर्ण असून वार्षिक उत्पन्न अंदाजे पाऊण कोटीच्या घरात आहे व परिसरातील गावाचा महसुल जवळजवळ आठ लाखाच्या आसपास होतो. या जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी हणमंतराव मानवीकर यांनी या शहराचे मोठ्या शहराशी असलेले सानिध्य व उपलब्ध असलेल्या सोयी लक्षात घेवून या गावातील काही क्षेत्र औद्योगिक परिसर म्हणुन जाहीर केलेला आहे. यामुळे नजिकच्या काळात या ठिकाणी अनेक उद्योगधंदे सुरू करण्यास अनुकूल वातावरण आहे.
      नळदुर्ग येथे एकेकाळी कार्यालय होते. इ.स. १९०४ पर्यंत नळदुर्ग हे जिल्ह्याचे केंद्र होते. शिपायांच्या बिल्ल्यावर (पाट्यावर) जिल्हा नळदुर्ग असे उर्दूत लिहिलेले आढळते. इ.स. १९०९ पर्यंत या ठिकाणी तालुक्याचे केंद्र होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील काही विभागाचे काम येथे चालत होते.
या ऐतिहासिक स्थानाचे महत्त्व कमी होऊ नये म्हणुन त्यावेळी निजामाने खास फर्मान काढुन तुळजापूर तालुक्याचे मुनसफ कोर्ट नळदुर्ग येथे ठेवले. १९०९ ते १९५१ पर्यंत नळदुर्ग येथे मुनसफ कोर्ट होते. स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात असलेल्या हैद्राबाद राज्याने जिथे तालुका तिथे कोर्ट तुळजापूरला हलविले आणि नळदुर्गच्या जनतेवर अन्याय केला. कारण अद्यापही परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्याचे मुन्सफ कोर्ट सेलू या ठिकाणी आहे.
     येथील किल्ल्यातील पाणी महल व परिसरातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. यावर्षी लाखोच्या संख्येने पर्यटकांनी या ठिकाणी हजेरी लावली. इंग्रजांच्या राजवटीत सोलापूरचे गव्हर्नर असलेले सर महाड टेलर येथील सौंदर्यावर मोहीत होवून नळदुर्ग हे दक्षिणेतील काश्मीर आहे, असा उल्लेख त्यांनी त्यांच्या ‘कन्फेशन ऑफ टंग्जद’ या पुस्तकात केला आहे. या किल्ल्याला माजी मुख्यमंत्री कै. कन्नमवार यांनी भेट दिली होती. त्यावेळी या परिसरातील नागरिकांनी नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु नंतर त्यांचे निधन झाले. त्यामुळे हा प्रश्‍न तसाच मागे पडत राहिला.
   नळदुर्गमधील जनता गेल्या कित्येक वर्षांपासुन या शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा, म्हणुन प्रयत्न करीत आहे. परंतू आतापर्यंत या प्रश्‍नाला यश मिळाले नाही. या परिसरातील व जनतेची मागणी लक्षात घेता नळदुर्गला तालुक्याचा दर्जा मिळावा, अशी कित्येक वर्षांपासुनची मागणी आहे. युतीचे शासन या भावनेची कदम करून नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा देईल, अशी आशा नागरिक बाळगुन आहेत.

0 comments:

Post a Comment